मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde News Today) यांना मंगळवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज त्यांची भेट घेऊन विचारपूस केल्यानंतर माध्यमांना मुंडे यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.
हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी चुकीची
‘धनंजय मुंडे यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची बातमी चुकीची आहे, त्यांना भोवळ आली होती,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मुंडेंना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा
आज सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली, यावेळी त्यांनी मुंडे यांची विचारपूस करत डॉक्टरांकडून माहिती घेतली.
डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिल्याचे यावेळी अजित पवार यांनी म्हटले. अजित पवार यांनी मुंडेंना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
‘भोवळ आल्याने शुद्ध हरपली ‘
मंगळवारी धनंजय मुंडे जनता दरबाराला उपस्थित होते, त्यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या दरम्यान प्रकृती अस्थिर होऊन त्यांना भोवळ आल्याने शुद्ध हरपल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही, धनंजय मुंडे यांना दूरध्वनीवरून संपर्क करत विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
तसेच लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे, पार्थ पवार, राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी देखील रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून चिंता
धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबतचे वृत्त पसरल्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तसंच काही कार्यकर्ते धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी मुंबईत येण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मुंबईत न येण्याचं आवाहन केलं आहे. डॉक्टरांनी सध्या मुंडे यांना आराम करण्याचा सल्ला दिला असून कोणालाही भेटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
जरा आराम केला, तर सर्व गोष्टी ठीक होतील
आम्हा सर्व राजकारणी मंडळींना रात्रंदिवस काम असते. त्यात धावपळ होते. सोमवारी ते परभणीवरुन आले. मंगळवारी जनता दरबार होता. या कामाच्या ताणामुळे असे होऊ शकते. डॉक्टरांनी मला बुधवारी बोलावलं आहे.
धनंजय मुंडे आमचे शेजारी आहेत. आमच्या मराठवाड्याचा भूमिपूत्र आहे. मी त्यांना सांगितलं की नॉर्मल राहा. चिंता करू नका,
असा मित्रत्वाचा सल्ला मी त्यांना दिला आहे. त्यांनी जरा आराम केला, तर सर्व गोष्टी ठीक होतील” अशीही माहिती राजेश टोपे यांनी मंगळवारी रात्री दिली हो