नवी दिल्ली : पुढील महिन्यात होणाऱ्या दिलीप करंडक स्पर्धेसाठी पश्चिम विभागाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अजिंक्य रहाणेची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सरफराज खानचा न्यूझीलंड अ संघाविरुद्ध खेळणाऱ्या भारत अ संघात समावेश करण्यात आला आहे. श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांचा पश्चिम विभागीय संघात समावेश करण्यात आला आहे.

पश्चिम विभागाच्या संघात मुंबईतील नऊ खेळाडूंची निवड झाली आहे. मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली, जिथे त्यांना मध्य प्रदेशकडून पराभव पत्करावा लागला. अजिंक्य रहाणेला आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळताना हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. यानंतर तो प्रथमच स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये खेळणार आहे. रहाणेला भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी त्याच्या बॅटमधून काही धावा मिळवायच्या आहेत.

श्रेयस अय्यर पुढील महिन्यात बेंगळुरू येथे न्यूझीलंड अ विरुद्ध भारत अ संघाकडून खेळणार नसल्याचेही समोर आले आहे. तो फक्त दिलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. विभागीय निवड समितीने मुंबईचे अव्वल फळीतील फलंदाज पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल, शम्स मुलानी आणि तनुष कोटियन यांची निवड केली. त्याचवेळी रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत शतक झळकावणारा यष्टीरक्षक फलंदाज हार्दिक तामोरेनेही संघात स्थान मिळवले.

विशेष म्हणजे संघातून वगळल्यानंतर अजिंक्य रहाणे रणजी ट्रॉफीमध्ये काही सामने खेळला होता. त्याला चेतेश्वर पुजाराची साथ होती पण तो कौंटीमध्ये खेळून संघात परतला.

पश्चिम विभागीय संघ

अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ (मुंबई), यशस्वी जैस्वाल (मुंबई), श्रेयस अय्यर (मुंबई), हार्दिक तामोरे (विकेटकीपर, मुंबई), शम्स मुलाणी (मुंबई), तनुष कोटियन (मुंबई), शार्दुल ठाकूर (मुंबई). राहुल त्रिपाठी (महाराष्ट्र), सत्यजीत बछव (महाराष्ट्र), हेत पटेल (गुजरात), चिंतन गजा (गुजरात), जयदेव उनाडकट (सौराष्ट्र), चिराग जानी (सौराष्ट्र), अतित शेठ (बडोदा)

स्टँडबाय प्लेअर

सिद्धार्थ देसाई (गुजरात), सुवेद पारकर (मुंबई), अरमान जाफर (मुंबई)