बॉलिवूडमधील बच्चन कुटुंब हे प्रसिद्ध कुटुंबांपैकी एक आहे. जेव्हा-जेव्हा हे कुटुंब घरातून बाहेर पडतो तेव्हा अनेकदा कॅमेरात कैद होत असतो. अलीकडेच अभिषेक पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्यासोबत नाईट आऊटवर गेला होता.

अभिषेक बच्चन पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चनसोबत शनिवारी रात्री बीकेसी म्हणजेच वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पोहोचले. जिथे त्यांना पाहून चाहते खूप खुश झाले होते.

नाईट आऊटसाठी हे तिघेही कॅज्युअल स्टायलिश आउटफिट्समध्ये दिसले. नेहमी आपल्या मुलीची काळजी घेणारी ऐश्वर्या पुन्हा एकदा आराध्याचा हात धरताना दिसली. यावेळी आराध्या खूप आनंदी दिसत होती.

मात्र, यावेळी ऐश्वर्या रायला लूज फिटिंग आउटफिटमध्ये पाहून लोकांनी ती आई होणार असल्याच्या चर्चा सुरू केल्या आहेत. तिचा लूक पाहून चाहते ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावत आहेत. ऐश्वर्याच्या गरोदरपणावर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकवेळा ही अफवा पसरली आहे, जी नेहमीच खोटी ठरली.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *