महाअपडेट टीम, 3 फेब्रुवारी 2022 : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल-मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील निवडणूक राज्यातील हापूर जिल्ह्यातून ते दिल्लीला परतत असताना अज्ञात व्यक्तींकडून त्यांच्या कारवर गोळीबार करण्यात आल्याने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

त्यांनी स्वतः या घटनेचा उलगडा केला आहे. ते या लाटयातून थोडक्यात बचावले असल्याचं त्यांनी सांगितलं.त्यांची कार राष्ट्रीय महामार्ग 24 च्या हापूर-गाझियाबाद विभागावरील छिजारसी टोल प्लाझाजवळ असताना संध्याकाळी 6 च्या सुमारास ही थरारक घटना घडल्याचं त्यांनी सांगितलं.

त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली. AIMIM खासदार म्हणाले, “काही वेळापूर्वी माझ्या वाहनावर चिजारसी टोल गेटवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. चार गोळ्या झाडण्यात आल्या. तिथे 3-4 लोक (शूटर) होते, ते सर्व पळून गेले असून त्यांना शस्त्रे तिथेच सोडून पळाले. माझी गाडी पंक्चर झाल्याने मी दुसऱ्या गाडीत बसून निघालो असताना हा प्रकार घडला. सध्या आम्ही सर्व सुरक्षित आहोत असं त्यांनी सांगितलं.

तेलंगणातील हैदराबादचे खासदार ओवेसी यांनी सांगितले की, मीरठ आणि किथोर येथे निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांसाठी ते सकाळी दिल्लीहून निघाले असताना या कार्यक्रमांमध्ये त्यांनी दुपारी 3.30 वाजता पायी पदयात्रा केली. त्यांच्या ताफ्यात चार वाहने होती. आम्ही टोल गेटवर आलो असताना आम्हाला अचानक तीन-चार गोळ्यांचा आवाज आला तेव्हा आम्ही वाहनाचा वेग कमी केला, माझ्या गाडीवरही गोळीबाराच्या खुणा असून गाडीचा टायर पंक्चर झाला आहे.

मी निवडणूक आयोगाला या घटनेची स्वतंत्र चौकशी करण्याची विनंती केली आहे. या घटनेमागे कोणाचा हात आहे हे कळायला हवे. ते (नरेंद्र) मोदी सरकार आणि योगी (आदित्यनाथ) सरकारलाही आवाहन असल्याचं त्यांनी सांगितलं.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिस अधीक्षक (एसपी) दीपक भुकर यांनी सांगितले की, या घटनेप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून दोघे जण फरार आहे. संशयिताची चौकशी सुरू असून या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे त्यांनी सांगितलं.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *