modi
After meeting PM Modi, Anupam Kher gave a special gift

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर हे अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करतात. सोशल मीडियावर अभिनेता नेहमीच त्यांच्यासाठी खास पोस्टही शेअर करत असतो. दरम्यान नुकतीच आता अनुपम खेर यांनी पीएम मोदींची भेट घेतली आहे. या ज्येष्ठ अभिनेत्याने पंतप्रधानांसोबतचे त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही माहिती दिली आहे.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता अनेकदा खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करतो. अनुपम खेर यांनी पीएम मोदींची भेट घेतल्यानंतर अभिनेत्याच्या आईने पाठवलेली खास भेटही त्यांना दिली आहे. अभिनेत्याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पीएम मोदींसोबतचे फोटो शेअर केले आहेत. अनुपम खेर यांनी या फोटोंसह एक खास पोस्टही लिहिली आहे.

त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी. आज तुम्हाला भेटून मन आणि आत्मा दोन्ही प्रसन्न झाले. तुम्ही देश आणि देशवासियांसाठी रात्रंदिवस करत असलेल्या परिश्रमाबद्दल आभार मानण्याची संधी मिळाली. आणि ज्या श्रद्धेने तुम्ही माझ्या आईने तुमच्या दिलेली रक्षणासाठी रुद्राक्षाची जपमाळ स्वीकारली ते आम्ही सदैव लक्षात ठेवू.

अनुपम खेर यांनी पोस्टच्या शेवटी लिहिले की, “देवाची तुमच्यावर सदैव कृपा असुदे, आणि आम्हा सर्वांना अशीच ऊर्जा देत राहा! जय हिंद!’ पीएम मोदींनीही अभिनेत्याच्या या ट्विटवर आपली प्रतिक्रिया दिली आणि भेटवस्तूबद्दल त्यांचे आभार मानले आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या उत्तरात लिहिले, ‘अनुपम खेर जी तुमचे खूप खूप आभार. हे आदरणीय माताजींचे आणि देशवासीयांचे आशीर्वाद आहेत, जे मला भारत मातेच्या सेवेसाठी सतत प्रेरित करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published.