गेल्या काही दिवसापासून कोरोना संसर्गमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दररोज रुग्ण आढळून येत आहेत. तर काहींचा मृत्यू देखील होत आहे. अशात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

यापूर्वी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे कोरोना विषाणूच्या विळख्यात आले आहेत.

उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी पोहोचलो होतो, तेव्हाच त्यांना कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती मिळाली, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांना बुधवारी सकाळी दक्षिण मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

कोश्यारी यांनी ट्विट करून सांगितले की, मला कोविड-19 ची लागण झाली आहे. माझ्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. मात्र, खबरदारी म्हणून मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, संसर्गाची पुष्टी झाल्यानंतर कोश्यारी (80) यांना रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a comment

Your email address will not be published.