मुंबई : कोणतीही गोष्ट सोशल मीडियावर येण्यास जास्त वेळ लागत नाही. अनेक सेलेब्सना याचा फटका बसला असून यावेळी टार्गेट आहे साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी(Sai pallavi). नुकतेच काश्मिरी पंडितांवर वादग्रस्त वक्तव्य करून वादात सापडलेल्या साई पल्लवीने आता यावर स्पष्टीकरण दिले आहे. ज्यामध्ये तिने असे काही बोलण्याचा प्रयत्न नसताना तिच्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे म्हटले आहे.

साई पल्लवीच्या या विधानाचे सावट सगळीकडे पसरल्यानंतर आता यावर अभिनेत्रीने स्पष्टीकरण दिले आहे. साई पल्लवी म्हणाली, “मी स्वतःशीच बोलत आहे की मी अशा प्रकारे बोलले, मी चकित झाले आहे हे पाहून कि मी जे बोलले त्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला आहे. हे पाहून मला धक्का बसला आहे. मी मुलाखतीत जे काही बोलले ते नीट मांडले गेले नाही. तरी…मी सर्वांची माफी मागते.”

खरं तर, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत साई पल्लवीने काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराची तुलना मॉब लिंचिंगशी केली होती. त्यानंतर या विधानाने पेट घेतला. तिच्या या वक्तव्याचा सोशल मीडियावर जोरदार निषेध करण्यात आला.

राजकीय पक्षानेही साई पल्लवीवर गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे हे प्रकरण जोर धरत असल्याचे पाहून आता साई पल्लवीने पुढे येऊन आपले म्हणणे मांडले आणि जे मांडले ते बोलले नसल्याचे सांगितले. तिला असं अजिबात वाटत नाही पण तिचं विधान फिरवून मांडण्यात आलं. त्याचवेळी तिने याबद्दल माफीही मागितली.

Leave a comment

Your email address will not be published.