बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मुंबईत तिच्या मित्रांसोबत पार्टी केली. यादरम्यान मलायकाचा लूक चर्चेचा विषय ठरला आहे. अभिनेत्री पुन्हा एकदा तिच्या लूकमध्ये परतली आहे. यादरम्यान मलायका जीन्स आणि बॅकलेस टॉपमध्ये दिसली.
अभिनेत्रीने कॅरी केलेला हा साधा लूकदेखील तिला खास बनवत आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, मलायकाने कॅपसह तिचा हा लूक पूर्ण केला आहे. यासोबत तिने गोल्डन कलरची पर्स कॅरी केली होती जी तिच्या लुकला अधिक सुंदर टच देत होती.
अपघातानंतर मलायका अरोरा आपल्या कामावर परतली आहे. अलीकडेच तिने एका पोस्टद्वारे चाहत्यांना ही माहिती दिली. मलायका अरोराचा नुकताच कार अपघात झाला होता. 2 एप्रिल रोजी पुण्यातील एका कार्यक्रमातून परतत असताना मलायकाच्या कारचा अपघात झाला आणि त्यात ती जखमी झाली होती. अशा परिस्थितीत, 16 दिवसांच्या विश्रांतीनंतर, अभिनेत्री पुन्हा कामावर परतली आहे.