मुंबई : अभिनेत्री ईशा गुप्ता (Isha gupta) हॉटनेसच्या बाबतीत अनेक सौंदर्यवतींना मागे टाकते. अभिनेत्रीने आश्रम 3 मध्ये अभिनेता बॉबी देओलसोबत बोल्ड सीन देऊन दहशत निर्माण केली होती. या मालिकेतील सोनियाची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. तेव्हापासून परिस्थिती अशी आहे की ईशाने कोणताही फोटो किंवा व्हिडिओ शेअर केला तर तो व्हायरल होतो. अशातच सध्या सोशल मीडियावर ईशा गुप्ताचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिच्या लग्नाबद्दल बोलताना दिसत आहे. ईशा गुप्ताचे हे शब्द ऐकून तिचे चाहते थक्क झाले आहेत.

ईशा गुप्ताचा हा व्हिडीओ बॉलिवूड इंस्टग्राम पेज व्हायरल भयानीने शेअर केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ईशा गुप्ता रस्त्यावर तिच्या कारची वाट पाहत होती, त्यावेळी पापाराझींनी अभिनेत्रीला घेरले आणि अनेक प्रश्न विचारले यावेळी तिला तिच्या लग्नाबद्दल देखील विचारण्यात आले. यावर बोलताना अभिनेत्री म्हणाली, ‘त्याला लग्न करायचे नाही, आणि का तो बिचारा लग्न करेन’

पुढे अभिनेत्री हसत पापाराझींना उत्तर देत म्हणाली, “मी लग्न करणार नाही. लग्नाची गरज काय? ईशाच्या लग्नाचा हा प्लॅन ऐकून चाहते आश्चर्यचकित झाले आणि कमेंट करून तिला प्रश्न विचारू लागले. एका चाहत्याने लिहिले, ‘कधी तरी लग्न करावेच लागेल.’ तर दुसऱ्याने लिहिले, ‘मी ऐकले आहे की तुझा बॉयफ्रेंड आहे, मग तू त्याच्याशी लग्न करणार नाहीस का?’

आश्रम 3 मधील ईशा गुप्ताचा अभिनय आणि बोल्डनेस लोकांना आवडला आहे. इंटिमेट सीनबाबत अभिनेत्री म्हणाली होती की, पडद्यावर हे सर्व करताना मला कोणतीही अडचण आली नाही. मालिकेत, सोनियाला बाबा निरालाच्या कारनाम्यांबद्दल माहिती मिळते आणि ती स्वतःचा फायदा करून घेते. प्रकाश झा यांच्या आश्रम या मालिकेतील हा तिसरा अध्याय होता आणि आता चौथा अध्यायही येणार आहे. यात बॉबी देओल, अदिती पोहनकर, ईशा गुप्ता, दर्शन कुमार, चंदन कुमार सन्याल, त्रिधा चौधरी आणि इतर प्रमुख भूमिकेत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published.