मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच ‘हड्डी’ चित्रपटात एका महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे, ज्यामध्ये नवाज ग्लॅमरस ब्युटी बनून चाहत्यांचे होश उडवताना दिसत आहे. आज आपण अशाच अभिनेत्यांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी महिलांची भूमिका साकारून पडद्यावर आग लावली होती.

1997 मध्ये आलेल्या ‘चाची 420’ चित्रपटातील कमल हसनच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. या चित्रपटात कमलने ‘मावशी’ची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूडमधील पूर्ण चक्रच बदलून गेले.

त्यानंतर ‘आंटी नंबर 1’ या चित्रपटात गोविंदाने महिला बनून लोकांच्या होश उडाले होते. या चित्रपटातील गोविंदाचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला होता. तसेच त्याची सर्वत्र प्रशंसा देखील होत होती.

प्रीती झिंटा, अक्षय कुमार आणि सलमान खान स्टारर ‘जानेमन’ या चित्रपटात सलमान खान एका ग्लॅमरस गर्लच्या लूकमध्ये दिसला होता. सलमानचे हे रूप पाहून प्रेक्षकही थक्क झाले होते, सलमान या लुकमध्ये जास्त छाप पाडू शकला नाही, पण त्याने ही भूमिका देखील उत्तम साकारली होती.

‘हमशकल्स’ चित्रपटात रितेश देशमुखने महिला बनून चाहत्यांना खूप गुदगुल्या केल्या होत्या. त्याचा हा अवतार प्रेक्षकांना खूप आवडला होता. रितेश यावेळचा एक किस्सा देखील शेअर केला होता, जेव्हा रितेश महिलेच्या भूमिकेत शूटिंग साठी पोहचला होता तेव्हा त्याला कोणीच ओळखले नव्हते आणि त्याला एका सहकलाकाराने डेट साठी देखील विचारले होते.

‘पेइंग गेस्ट’ या चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदेने एका महिलेची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या अष्टपैलू अभिनयाचे खूप कौतुक झाले. तसेच त्याची प्रशंसा देखील खूप झाली.