नवी दिल्ली : T20 विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेल्या सूर्यकुमार यादवनेची तुलना एबी डिव्हिलियर्सशी म्हणजेच ‘मिस्टर 360 डिग्री’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फलंदाजाशी केली जाते, पण सूर्यकुमारला याबाबत विचारले असता त्याने अजूनही स्वतः अपरिपक्व म्हटले आहे, यावरच दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाने प्रतिक्रया दिली आहे. क्रिकेटमध्ये डिव्हिलियर्सला मिस्टर 360 डिग्री या टोपण नावाने ओळखले जाते कारण तो मैदानाच्या सर्व बाजूंनी शॉट मारण्यास सक्षम आहे.

सूर्यकुमारने चालू विश्वचषकातील पाच सामन्यांमध्ये 225 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने तीन अर्धशतके झळकावली आहेत. यादरम्यान, त्याने 75 च्या सरासरीने धावा केल्या आहेत, तर त्याचा स्ट्राइक रेट 193.97 आहे. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यावर फटकेबाजी करण्याच्या क्षमतेने सूर्याने क्रिकेट तज्ञ आणि चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. या 32 वर्षीय खेळाडूने कठीण परिस्थितीतही आपली क्षमता दाखवली आहे.

पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सूर्यकुमारने अशीच एक खेळी केली होती, जेव्हा आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीसमोर कोणताही खेळाडू टिकू शकला नाही, तेव्हा सूर्याने शानदार खेळी करत संघाला संकटातून बाहेर काढले होते. पण डीव्हिलियर्सशी आपली तुलना फेटाळून लावत सूर्यकुमार म्हणाला होता की फक्त एकच खेळाडू ‘मिस्टर 360 डिग्री’ या पदवीला पात्र आहे, परंतु दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स सूर्याच्या मुद्द्याशी असहमत आहे.

तो म्हणाला, “मी सूर्यकुमारसाठी खूप आनंदी आहे. मला वाटते की तो खूप पुढे आला आहे. मला त्याच्याकडून इतकी चांगली कामगिरी अपेक्षित नव्हती. डिव्हिलियर्स म्हणाला, सुरुवातीला चांगला खेळ केल्यानंतर तो गोलंदाजांवर वर्चस्व गाजवतो. हे पाहणे मनोरंजक आहे आणि त्याचे भविष्य खूप चांगले आहे. जेव्हा डीव्हिलियर्सला विचारण्यात आले की सूर्यकुमार यादवची त्याच्याशी तुलना करण्याची वेळ आली आहे, तेव्हा तो म्हणाला, “हो, तो माझ्यासारखाच खेळतो. त्याला फक्त कामगिरीत सातत्य ठेवण्यावर भर द्यावा लागेल. पुढील 5-10 वर्षे असेच खेळत राहावे लागेल.”