मुंबई : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) ‘बाबा निराला’ बनून पुन्हा एकदा लोकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या ‘आश्रम’ (ASHRAM) या वेबसिरीजच्या दोन सीझननंतर लोक तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आता लोकांची प्रतीक्षा संपली आहे, कारण आश्रम 3 चा ट्रेलर रिलीज झाला आहे.

या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा ‘बाबा निराला’ बनलेल्या बॉबी देओलचे ‘बदनाम’ कोर्ट पाहायला मिळत आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर लोक या सीरिजच्या सर्व भागांच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. ट्रेलरसोबतच ‘आश्रम 3’ ची रिलीज डेटही समोर आली आहे.

या ट्रेलरची सुरुवात गरिबांच्या बाबांच्या जयजयकाराने होते, जिथे बाबा हात जोडून लोकांमधून त्यांच्या दरबारात जातात. यानंतर बॉबी देओल आपल्या आसनावर बसून एक दमदार डायलॉग बोलताना दिसला, “जो मैं बोलूं वो खाऊं और जो मैं चाहूं वह मुझे मिले”. बाबा निराला बनलेल्या बॉबी देओलची रणनीती आणि हुशारी तसेच शक्ती या ‘आश्रम 3’ वेबसिरीजमध्ये चांगलीच पाहायला मिळत आहे, पण त्याचवेळी त्रिधा चौधरी व्यतिरिक्त ईशा गुप्ताचा बोल्ड अवतारही पाहायला मिळत आहे. या सीरिजमध्ये ती, बॉबी देओलला तिच्या सौंदर्याने भुरळ घालताना दिसत आहे.

ट्रेलरमध्ये एकीकडे भक्त बाबांचा जयजयकार करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे राजकारणापासून ते खाकी वर्दीतील लोक बाबांचा ढोंगीपणा जगासमोर आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. बाबा निरालाचा ‘बदनाम दरबार’ पुन्हा एकदा उघडला असून आस्थाच्या नावाने पुन्हा एकदा बॉबी देओल ढोंगीपणाच्या सीमा ओलांडताना दिसत या ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

बॉबी देओलच्या मोस्ट अवेटेड वेब सीरिजच्या ट्रेलर लॉन्चसोबतच, निर्मात्यांनी त्याची रिलीज डेटही जाहीर केली आहे. ही वेब सिरीज MX Player वर 3 जून रोजी रिलीज होत आहे. मालिकेचे सर्व भाग एकाच दिवशी एकाच वेळी प्रदर्शित होतील. बॉबी देओल आणि ईशा गुप्ता व्यतिरिक्त, या मालिकेत अदिती पोहनकर, दर्शन कुमार, त्रिधा चौधरी, अध्यायन सुमन, सचिन श्रॉफ यांच्यासह अनेक स्टार्स मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘आश्रम 3’ चे दिग्दर्शन आणि निर्मिती प्रकाश झा यांनी केली आहे.

Leave a comment

Your email address will not be published.