मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानने(Amir khan) नुकताच आपल्या लाकडकीचा म्हणजेच इरा खानचा (Ira khan)वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, आता या चित्र पाहून नेटकऱ्यांनी ट्रोल करण्याची एकही संधी सोडली नाही.
आमिर खानची मुलगी आयरा खानने रविवारी 8 मे रोजी तिचा 25 वा वाढदिवस साजरा केला, ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आमिरने आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त पूल पार्टीचे आयोजन केल्याचे पाहायला मिळत आहे.
केक कापताना आयरा बिकिनीमध्ये दिसली आणि या बिकिनीने ट्रोलर्सचे लक्ष वेधून घेतले. या फोटोत आमिरही शर्टलेस दिसत आहे, तर मुलगा आझादही त्याच्यासोबत दिसत आहे. आयराच्या या फोटोमुळे ती सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे.
इरा खान ही एक अशी स्टार किड आहे जिने अद्याप चित्रपटांमध्ये प्रवेश केलेला नाही, तरीही ती खूप प्रसिद्ध आहे. इरा खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दररोज ती काही ना काही पोस्ट शेअर करत असते.
इराने सोशल मीडियावर तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत. इरा मानसिक आरोग्याबाबतही खूप जागरुक आहे आणि प्रत्येक वेळी तिने या विषयावर खुलेपणाने बोलले आहे, नुकताच तिने स्वतःशी संबंधित एक मोठा खुलासाही केला आहे.
एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये इरा खानने सांगितले होते की, “ती सध्या कठीण टप्प्यातून जात आहे कारण नैराश्यानंतर तिला आता चिंताग्रस्त झटके येऊ लागले आहेत. इराने लिहिले की, मला एंग्जाइटी अटॅक्स येऊ लागले आहेत, मी घाबरले आणि रडायला सुरुवात केली.
एंग्जाइटी अटॅक्स कसा असतो हे मला माहीत नाही, पण जितके मी समजू शकते, त्याच्यामुळे हृदयाचे ठोके वाढणे, श्वास घ्यायला त्रास होणे, रडणे इत्यादी आहेत आणि नंतर तो वाढतच जातो. काहीतरी खूप भयानक घडणार आहे असे दिसते. इरा ही पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.