माजी आमदार पाशा पटेल यांना पुत्रशोक झाला आहे. आज सकाळी पाशा पटेल यांचे पुत्र अॅड. हसन पटेल यांचं यांचं निधन झालं आहे. वयाच्या 38 व्या वर्षी हसन पटेल यांचे निधन झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.

मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. लातूरच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची मूत्यूशी सुरु असलेली झुंज संपली आहे. आज दुपारी दोन वाजता लोदगा येथे त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अॅड. हसन पटेल यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. हसन पाशा पटेल हे मागील काही वर्षांपासून मुंबई हायकोर्टात वकिली करत होते. लॉकडाऊनमध्ये ते लातूरमध्ये आले होते.

त्यानंतर प्रकृती अस्वस्थतेमुळं ते लातूरमध्ये होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लातूमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

अ‍ॅड. पाशा पटेल यांचे पुत्र अ‍ॅड. हसन पटेल मात्र राजकारणापासून कायमच दूर राहिल्याचे दिसून आले. ते मागील काही वर्षांपासून मुंबई हायकोर्टात वकिली करत होते. लॉकडाऊनमध्ये ते लातूरमध्ये आले होते.

त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने ते लातूरमध्येच वास्तव्यास होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर लातूमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारांनंतर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

हसन पाशा पटेल यांचा दफनविधी आज दुपारी होणार आहे. दुपारी 2 वाजता औसा तालुक्यातील लोदगा येथील फिनीक्स शैक्षणिक संकुलाच्या शेजारी होणार आहे. त्यांच्या पश्चात आई-वडिल, दोन भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.

पाशा पटेल हे शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेत कार्यरत होते. या संघटनेचे अध्यक्षपद भूषविलेल्या पाशा पटेल यांना त्यावेळी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी पक्षात आणले.

शेतकरी चळवळीतील भाजपचा मुस्लिम चेहरा दाखवण्यासाठी त्यांना विधानपरिषदेची आमदारकी देण्यात आली. मात्र मुंडे यांच्या निधनानंतर बहुजन, अल्पसंख्यांक समाजात भाजपचे काम वाढवण्याचा प्रयत्न करणारे पाशा पटेल यांना भाजपने सध्या अडगळीत टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे.