प्रदीर्घकाळ चालेला एसटी संप मिटला. कर्मचारी कामावर आले. गाड्या सुरू झाल्या. उन्हाळ्याच्या सुट्यांचा हंगाम सुरू झाल्याने प्रवाशीही वाढले. अशारितीने एसटीला पुन्हा चांगले दिवस येत असताना आता नवीनच अडचण निर्माण झाली आहे.

आता एसटीमध्ये तिकिटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. ६० टक्क्यांहून अधिक इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन बंद आहेत. जुन्या पद्धतीच्या तिकिटांची छपाईही बंद असल्याने तीही उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे महामंडळापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

एसटी महामंडळात वापरात असलेल्या ३४ हजार ईटीव्हीएम मशिनपैकी १९ हजार मशीन बंद आहेत. सध्या सुरू असलेल्या मशिनमधून तिकीट व्यवस्थित छपाई न होणे, मशिनमधील बटण कार्यान्वित नसणे, मशिनमधून तिकीट बाहेर न येणे, चार्जिंग लगेच उतरणे अशा तक्रारी येत आहेत.

काही एसटी अधिकाऱ्यांचे वादग्रस्त ट्रायमॅक्स कंपनीशी आर्थिक हितसंबंध आहेत. यामुळेच इलेक्ट्रॉनिक तिकीट व्हेंडिंग मशिनसाठी (ईटीव्हीएम) नवीन कंपनी नियुक्त करण्यात आलेली नाही, अशीही चर्चा महामंडळात सुरू आहे.p

विदर्भ, खान्देश भागात ईटीव्हीएम नसल्याने अनेक ठिकणी ट्रेमधील तिकीट फाडून दिले जाते. दुसरीकडे कुर्ला छपाई कारखान्यात तिकीट छपाई बंद करण्यात आल्याने साध्या तिकिटांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. याचा परिणाम प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सेवेवर होत आहे.

Leave a comment

Your email address will not be published.