श्रीलंकेत पुन्हा आणीबाणी लागू केल्यानंतर पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव येत आहे. त्यासाठी देशभर आंदोलने सुरू आहेत.

कायदा व सुव्यस्थेची परिस्थिती हातळण्यासाठी आता तेथे देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील वातावरण अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.

श्रीलंकेत महिनाभरात दुसऱ्यांदा आणीबाणी लागू करण्याच्या श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांच्या निर्णयास मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर, श्रीलंका सरकारने पुन्हा एकदा आणीबाणी लागू केली.

त्यामुळे, पोलिस आणि सुरक्षा दलांना कोणालाही ताब्यात घेण्याचे अधिकार मिळाले आहेत. तरीही परिस्थिती सुधारत नसल्याने आता तेथे संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Leave a comment

Your email address will not be published.