आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अकरावा सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात चेन्नई आणि पंजाब किग्ज या दोन संघांमध्ये लढत झाली. मात्र या सामन्यात चेन्नईचा लाजिरवणा पराभव झाला.

आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्स खूप खराब कामगिरी करत आहे. मागच्या 12 सीजनपेक्षाही वाईट कामगिरी चेन्नई या सीजनमध्ये करतेय. आज पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईने पराभवाची हॅट्ट्रिक केली.

चेन्नईने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केलं. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 180 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा डाव अवघ्या 126 धावात आटोपला.

पंजाबने 54 धावांनी मोठ्या विजयाची नोंद केली. चेन्नईकडून फक्त शिवन दुबेने सर्वाधिक (57) धावांची खेळी केली. चेन्नईने लागोपाठ तीन सामने गमावले असून हा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर गेला आहे.

दरम्यान सलामीच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) त्यानंतर लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि आज पंजाब किंग्सने CSK चा पराभव केला. मागच्या सामन्याच्या तुलनेत चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजीत सुधारणा दिसली. पण फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात निराशाजनक प्रदर्शन कायम होतं.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *