मुंबई : दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याने मागील वर्षी 2 सप्टेंबर रोजी जगाचा निरोप घेतला. रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ नंतर टीव्ही अभिनेता सिद्धार्थ प्रचंड लोकप्रिय झाला. गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ४० व्या वर्षी या अभिनेत्याचे निधन झाले. सिद्धार्थला एक वर्ष उलटून गेले तरी त्याचे चाहते त्याला क्षणभरही विसरू शकले नाहीत. सिद्धार्थची आठवण करून केवळ देशातीलच नाही तर जगभरातील त्याचे चाहते आज भावूक होत आहेत.

‘बालिका वधू’ या टीव्ही शोमधून सिद्धार्थ शुक्लाला घरोघरी ओळख मिळाली. ‘बिग बॉस 13’ या शोचा भाग बनल्यानंतर सिद्धार्थची लोकप्रियता दुप्पट झाली होती. शो दरम्यान सिद्धार्थचे अनेक स्पर्धकांसोबत भांडण व्हायचे आणि अनेकांशी जबरदस्त मैत्री होती. या शोनंतरच शहनाज गिलसोबतच्या त्याच्या जबरदस्त केमिस्ट्रीमुळे चाहत्यांनी ‘सिडनाज’ हे नाव ठेवलं होतं.

सिद्धार्थ शुक्ला आज आपल्यासोबत नाही पण त्याच्या चाहत्यांना त्याची खूप आठवण येते. आजच्या दिवशी चाहते सिद्धार्थच्या आठवणीत खूप भावुक झाले आहेत. चाहत्यांसह त्याचा मित्र परिवार देखील त्याच्या आठवीत भावुक आहे.

सिद्धार्थ शुक्लाची फॅन फॉलोइंग भारतातच नाही तर सीमेपलीकडेही होती. असाहतच पाकिस्तानचा चाहता कुमेल अब्बास रिझवीने सांगितले की, ‘गेल्या काही वर्षांत माझ्यासारखे लाखो चाहते त्याच्याबद्दल, त्याचा जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाबद्दल बोलतात. जेव्हा-जेव्हा आपल्या देशात काही वाईट घडते तेव्हा त्याला आपल्या सुरक्षेची काळजी वाटायची. त्याने भारतीय, पाकिस्तानी किंवा बांगलादेशी चाहत्यांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. दुसरीकडे, टोरंटोच्या निकिता शर्माचा असा विश्वास आहे की शहनाज गिल हीच सिद्धार्थ शुक्लाचा वारसा जिवंत ठेवत आहे. आपण शहनाजमध्ये सिद्धार्थ पाहतो आणि मला खात्री आहे की तो देखील आपल्याला पाहत आहे.