अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकले आहेत. या लग्नानंतर आता आलियाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

आलियाचा ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट आता हा ओटीटीवर येण्यास सज्ज झाला आहे. त्यामुळे आता ज्या प्रेक्षकांना हा सिनेमा थिएटरमध्ये बघता आला नाही त्यांना लवकरच घरबसल्या हा सिनेमा पाहता येणार आहे.

‘गंगुबाई काठियावाडी’ हा सिनेमा लवकरच नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. नेटफ्लिक्स इंडियाने याबाबत अधिकृत घोषणा करत माहिती दिली आहे. सिनेमा नेटफ्लिक्सवर २६ एप्रिलपासून पाहता येणार आहे. नेटफ्लिक्स इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. नेटफ्लिक्स इंडियाने अशी इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे की, ‘बघा चाँद नेटफ्लिक्सवर येणार आहे.’

दरम्यान, ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट २५ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून या चित्रपटाने १५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटात आलिया भट्ट व्यतिरिक्त अजय देवगण आणि विजय राज यांनीही अप्रतिम काम केले आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साली यांनी केले आहे.

Leave a comment

Your email address will not be published.