मुंबई : चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. पत्नीला कारने चिरडल्याचा आरोप त्याच्यावर होता. यानंतर तो अनेक दिवस फरार होता. त्याला गुरुवारी रात्री मुंबई पोलिसांनी अटक केली. आता त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पत्नीला कारने चिरडल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

एएनआयच्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्राविरुद्ध आयपीसीच्या कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटकेनंतर त्याला अंधेरी न्यायालयात हजर केले असता 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. म्हणजेच कमल आता रविवारपर्यंत कोठडीत राहणार आहे.

किशोर मिश्रा यांच्या पत्नीलाही गंभीर दुखापत झाली आहे. तिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ही घटना 19 ऑक्टोबर रोजी पश्चिम अंधेरी येथील निवासी अपार्टमेंटच्या पार्किंग परिसरात घडली. व्हिडीओमध्ये एक महिला कार थांबवण्याचा प्रयत्न करते, पण ड्रायव्हर गाडी न थांबवतो आणि तिला धडकतो आणि जेव्हा महिला पडते तेव्हा ती गाडीच्या पुढच्या चाकाला अडकते, असे व्हिडिओमध्ये दिसत होते.

कमल किशोर यांच्या पत्नीचा दावा आहे की पतीने तिला कारने जखमी केले आहे. कारमध्ये तिचा पती कमल होता. तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, ती तिच्या पतीला भेटण्यासाठी घरी पोहोचली होती, परंतु कारमध्ये तिने त्याला दुसऱ्या महिले सोबत पाहिले होते, तिने दोघांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता कमलने तिच्यावर हल्ला केला.

या घटनेनंतर कमलकिशोर मिश्रा फरार झाला होता. त्यांच्या पत्नीने त्यांच्याविरोधात आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. व्हिडिओ पाहिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून निर्मात्याचा शोध सुरू केला. त्याला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली.