महाअपडेट टीम,11 मार्च 2022 : सोलापुर जिल्ह्यातील अक्कलकोट येथून एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. अक्‍कलकोट-गाणगापूर रस्त्यावरील कर्नाटक हद्दीत बळुरगी गावाजवळ एका भीषण अपघातात 5 लोकांना जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये चालकासह 4 महिलांचा समावेश असून असे एकूण जण जागीच ठार झाले आहेत तर दोनजण गंभीर जखमी झाले.

भरधाव कारचा टायर फुटल्याने गाडीवरील ताबा सुटून गाडी झाडावर आदळल्याने हा भयंकर अपघात दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

या अपघातामध्ये बाबासाहेब सखाराम वीर, राणी बाबासाहेब वीर, कोमल बाबासाहेब वीर, हिराबाई वीर, छाया बाबासाहेब वीर यांचा जागीच मृत्यू झाला. तर साहिली बाबासाहेब वीर, चैत्राली दिनकरा सुरवशी गंभीर जखमी झाले आहे. सर्व मृत आणि जखमी हे अहमदनगर जिल्ह्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे.

अपघातानंतर घटनास्थळी पोलीस अन् ग्रामस्थ पोहचल्याने जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या अपघाताच्या घटनेची अफझलपूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

कारमधील सर्वजण दगावल्‍याने व दोनजण वाचलेले गंभीर जखमी असल्याने अहमदनगर वरून नातेवाईक निघाले आहेत. ते आल्यावरच रात्री उशिरा फिर्याद दाखल होईल अशी माहिती अफझलपूरचे पीएसआय विश्वनाथ मुदरेड्डी यांनी दिली.

सर्व प्रवाशी अहमदनगरचे असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ते कर्नाटकातील प्रसिध्द दत्त मंदिर गाणगापूर येथे दर्शन करून अक्कलकोट मार्गे अहमदनगरकडे जात होते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *