नवी दिल्ली : आयपीएल 2023 लिलावापूर्वी, सर्व संघांनी राखून ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे, परंतु त्यापूर्वी केकेआर संघाच्या 3 स्टार खेळाडूंनी आयपीएल 2023 पासून स्वतःला वेगळे केले आहे. यामुळे केकेआर संघाला मोठा धक्का बसला आहे. जाणून घेऊया या खेळाडूंबद्दल.

इंग्लंडचा T20 विश्वचषक विजेता अॅलेक्स हेल्स इंडियन प्रीमियर लीग 2023 मधून बाहेर पडला आहे. त्याची फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) याची घोषणा केली. हेल्स हमवतन सॅम बिलिंग्ज आणि ऑस्ट्रेलियन कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार पॅट कमिन्स हे तीन खेळाडू आयपीएलच्या पुढील हंगामाला मुकणार आहेत.

केकेआरने ट्विटमध्ये म्हटले आहे की, “वैयक्तिक आणि राष्ट्रीय संघाच्या वचनबद्धतेमुळे पुढील वर्षीचे आयपीएल वगळण्याच्या सॅम बिलिंग्ज, पॅट कमिन्स आणि अॅलेक्स हेल्स यांच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. या सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.”