नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) युवा खेळाडू अयान अफझल खानने शुक्रवारी (18 नोव्हेंबर) नेपाळविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात आपल्या अष्टपैलू कामगिरीने इतिहास रचला आहे. अफझल खानने प्रथम फलंदाजीत अर्धशतक झळकावले आणि नंतर गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली.

8व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अफझल खानने 63 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 54 धावा केल्या. त्यामुळे यूएई संघाने 9 गडी गमावून 176 धावा केल्या. तो त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.

प्रत्युत्तरात नेपाळच्या संघाने आसिफ शेख (नाबाद 88) आणि ज्ञानेंद्र मल्ला (64 धावा) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 40.1 षटकांत 4 गडी गमावून विजय मिळवला. गोलंदाजीत अफझलने 10 षटकात 27 धावा देत 1 विकेट गेहतली. या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात अफझल खानने 14 धावांत 4 विकेट घेतल्या होत्या. हा त्याचा या फॉर्मेटमधील पदार्पण सामना होता.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 पेक्षा जास्त धावा करणारा आणि एका सामन्यात 4 विकेट घेणारा अफझल खान हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. वयाच्या १७ वर्षे ३ दिवसांत हा पराक्रम करून त्याने सचिन तेंडुलकरला मागे सोडले आहे.

अफझल खानने 17 वर्षे 210 दिवस वयात हा पराक्रम करणाऱ्या पाकिस्तानच्या मोहम्मद अमीरचा विक्रम मोडला. तर सचिन तेंडुलकरने 18 वर्षे 181 दिवसांत हे स्थान मिळवले आहे.

ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषक 2022 मध्ये अफजल खान UAE संघाचा भाग होता. या स्पर्धेत त्याने सर्वात तरुण खेळण्याचा विक्रम केला.