महाअपडेट टीम : जनरल बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत या देखील तामिळनाडूतील कुन्नूर येथे क्रॅश झालेल्या Mi-17V5 मध्ये होत्या. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. बिपिन रावत हे वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये व्याख्यान देण्यासाठी जात होते. त्यांचे हेलिकॉप्टर गंतव्य स्थानावर पोहोचण्याच्या काही मिनिटांपूर्वीच क्रॅश झालं
बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षा होत्या आणि सामाजिक सेवांमध्ये त्या सक्रियपणे सहभागी असायच्या.
मधुलिका रावतबद्दल या 7 मोठ्या गोष्टी जाणून घ्या…
1. मध्य प्रदेशातील शहडोल येथील रहिवासी असलेल्या मधुलिका रावतचा विवाह 1986 मध्ये बिपिन रावत यांच्याशी झाला होता. त्यांना दोन मुली आहेत. एक मुंबईत तर दुसरी मुलगी त्याच्यासोबत राहते.
2. मधुलिकांनी तिचं शालेय शिक्षण ग्वाल्हेरमधील सिंधिया कन्या विद्यालयातून पूर्ण केलं आणि दिल्ली विद्यापीठातून मानसशास्त्राचा अभ्यास केला.
3. बिपिन रावत सैन्यात कॅप्टन असताना मधुलिकाने त्यांच्याशी लग्न केलं.
4. मधुलिका रावत यांचे कुटुंब सध्या शहडोल जिल्हा मुख्यालयात असलेल्या ‘राजाबाग’ या वडिलोपार्जित निवासस्थानी वास्तव्यास आहे.
5. त्यांचे वडील मृगेंद्र सिंह हे शडोल जिल्ह्यातील सोहागपूर संस्थानाचे राजकुमार होते.1967 आणि 1972 मध्ये ते काँग्रेसचे आमदारही होते.
6. आर्मी वाइव्हज वेलफेअर असोसिएशनच्या प्रमुख कार्यकर्त्या म्हणून, मधुलिका रावत यांनी लष्कराच्या विधवांसाठी अनेक कल्याणकारी कार्यक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
7. मधुलिका रावत यांचा भाऊ यशवर्धन सिंह यांनी सांगितले की, बिपिन रावत यांची शेवटची भेट दिल्लीत दसऱ्याच्या मुहूर्तावर झाली होती. यादरम्यान रावत यांनी तिला मधुलिकाच्या मूळ गावी शहडोल येथे जाऊन सैनिक शाळा उभारण्यास मदत करण्याचे वचन दिलं होतं.