मुंबई : मनी लाँडरिंग प्रकरणात अडकलेला सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आता चित्रपट अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सुकेश चंद्रशेखर फसवणूक प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) शुक्रवारी नोरा फतेहीची सुमारे 6 तास चौकशी केली आहे.

याप्रकरणी नोरा फतेहीला गेल्या दिवशी मंदिर मार्गावरील आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. नोरा काल सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तिथे हजर होती. याप्रकरणी त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवून घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गरज पडल्यास नोरा फतेहीला पुन्हा बोलावले जाऊ शकते.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सुकेश चंद्रशेखर नावाच्या व्यक्तीने अनेकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे सुकेश चंद्रशेखरवर 200 कोटी रुपयांचे खंडणी रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणात जॅकलीन फर्नांडिसचेही आले आहे, जेव्हा तिच्या आणि सुकेशच्या लिंक अपची बातमी समोर आली. स्वत: जॅकलिन फर्नांडिसने सांगितले होते की सुकेशने तिला महागडे गिफ्ट्स दिले होते. तेव्हापासून ही अभिनेत्री ईडीच्या निशाण्यावर आहे. जॅकलीन शिवाय नोरा फतेही देखील या प्रकरणात अडकली आहे.