मुंबई : वसीम अक्रम हा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज आहे. वसीम अक्रमने 356 एकदिवसीय सामन्यांमध्ये 23.52 च्या सरासरीने 502 विकेट घेतल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये वसीम अक्रमपेक्षा केवळ मुथय्या मुरलीधरनने (५३४ विकेट्स) जास्त विकेट घेतल्या आहेत. या लेखात वसीम अक्रमचा विक्रम मोडू शकणार्‍या 5 क्रिकेटपटूंनबद्दल बोलूयात.

मिचेल स्टार्क :

ऑस्ट्रेलियाचा 32 वर्षीय वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी बीबीएल आणि आयपीएलसारख्या लीगपासून दूर आहे. मिचेल स्टार्कच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सध्या 211 विकेट आहेत. जर स्टार्कने तंदुरुस्ती राखली आणि उत्कृष्ट फॉर्ममध्ये गोलंदाजी केली तर तो हा पराक्रम मोडू शकेल .

जसप्रीत बुमराह :

28 वर्षीय जसप्रीत बुमराहने आतापर्यंत भारतासाठी 72 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये गोलंदाजाने 24.31 च्या प्रभावी सरासरीने 121 विकेट घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहने फिटनेस राखला तर तो वसीम अक्रमचा हा विक्रम मोडण्याचा प्रबळ दावेदार आहे.

राशिद खान :

अफगाणिस्तानचा 24 वर्षीय स्टार फिरकीपटू रशीद खानमध्येही हा पराक्रम करण्याची क्षमता आहे. राशिद खानने आतापर्यंत 83 एकदिवसीय सामन्यांमध्ये 18.65 च्या सरासरीने 158 विकेट घेतल्या आहेत. राशिद खानमध्ये अजून बरेच क्रिकेट बाकी आहे, त्यामुळे तो 500 हून अधिक विकेट घेण्याचा प्रबळ दावेदार आहे.

अर्शदीप सिंग :

23 वर्षांचा उदयोन्मुख भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग अद्याप वनडेमध्ये पदार्पण करू शकला नाही. पण, ज्याप्रकारे त्याने कमी कालावधीत टी-20 क्रिकेटमध्ये ठसा उमटवला आहे, ते पाहता तो लवकरच एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करेल अशी अपेक्षा आहे. अर्शदीप सिंगने आतापर्यंत 20 टी-20 सामन्यात 29 विकेट घेतल्या आहेत.

टिम साऊदी :

न्यूझीलंडचा ३३ वर्षांचा गोलंदाज टिम साऊदी हा फिटनेसच्या बाबतीत जागतिक क्रिकेटमधील सर्वात तंदुरुस्त खेळाडूंपैकी एक आहे. टीम साऊदीच्या नावावर 148 वनडेत 199 विकेट्स आहेत. वसीम अक्रमचा विक्रम मोडण्यापासून टीम साऊदी अजूनही खूप दूर आहे पण, तो असे करण्याची शक्यता आहे.