देशात करोनाची परिस्थिती आता निवळली असली तरी या काळात देशात तब्बल ४७ लाख करोना मृत्यू झाल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO ) केला आहे.
यावरून मोठी खळबळ उडाली असून हा अहवाल भारताने नाकारला आहे. WHO च्या रिपोर्ट नुसार भारतात कोविडमुळे ४७ लाख मृत्यू झाले आहेत.
हा आकडा आपल्या केंद्र सरकारी आकड्यांच्या दहापट आहे. कोविडमुळे जगभरात एकूण जे मृत्यू झाले त्यापैकी भारतातच एक तृतीयांश झाल्याचे हा अहवाल सांगतो.
अर्थात आपले सरकार मात्र या आकड्यांशी सहमत नाही. मात्र आरोग्य संघटनेचा हा अहवाल खळबळ उडविणारा ठरत आहे.