Take a fresh look at your lifestyle.

स्वप्निल खाडे यांच्या पाठपुराव्याला यश ; …अखेर नगर – बीड रोड मजबुतीकरण काम सुरू.

महाअपडेट टीम, 10 जानेवारी 2022 : गेल्या कित्येक दिवसापासून राष्ट्रीय महामार्ग 548 डी.अहमदनगर ते बीड रोड हा जामखेड मार्गे जाणारा रस्ता जामखेड ते सौतडा घाट बीड रोड जामखेड पर्यंत अतिशय खराब झालेला होता.

बीड जिल्हा तसेच मराठवाड्यात प्रवेश करणारा जामखेड मधून जाणारा हा रस्ता, त्यामुळे लोकांची जास्त दळण वळण करणारा व लहानमोठी वाहतूक ह्या मार्गाने जास्त होत असते.

राष्ट्रीय महामार्ग उपअभियंताचे कार्यालय हे अहमदनगर येथे असल्याने स्थानिकच्या नागरिकांना आपल्या तक्रारी व म्हणने मांडण्यासाठी तिथं पोहचता येत नसे,जामखेड च्या रस्त्यावर सतत लहानमोठे अपघात हे रस्ता खराब असल्यामुळे व्हायचे.सतत ह्या मार्गावर अपघात होत असून नागरिक मृत्युमुखी पडत आहेत.

या राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता व सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करत होते,त्यामुळे जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल खाडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून निवेदन देत राहिले,व वारंवार सांगूनही स्वप्नील खाडे यांची दखल घेत नसल्यामुळे खाडे यांनी दि.25/ऑगस्ट / 2021 रोजी जामखेड येथील तहसील कार्यालयाच्या समोर “जागरण गोंधळ” आंदोलन असे लाक्षणिक आंदोलन केले होते.

व त्यानंतर ही दखल घेतली जात नव्हती म्हणून श्री खाडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांना दूरध्वनी वरून संपर्क करून या रस्त्याची तक्रार केली होती,तसेच वारंवार पाठपुरावा करत, आंदोलने केले होते,उपअभियंता श्री.तरडे यांनी 4 महिन्यात डांबरी करण करून मजबुतीकरण करू असा शब्द दिला होता.

तो शब्द पाळत आज पासून रस्ता मजबुती करण करणे चालू झाले आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील खाडे यांची जामखेड शहरातील व तालुका परिसरात नागरिक हे कौतुक करत आहेत.