Advertisement

ब्रेकिंग : कोरोनामुक्त गावात दहावी-बारावीचे वर्ग सुरु होणार, मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले ‘हे’ आदेश

Advertisement

महाअपडेट टीम, 22 जून 2021 :- जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावातील इयत्ता दहावी-बारावीचे वर्ग सुरु करता येतील का याची शक्यता विभागाने तपासून पाहावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

Advertisement

आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांचे कडक पालन करत गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावांमधील १० वी तसेच १२ वीचे वर्ग सुरु करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

Advertisement

कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनामार्फत उचलण्याबाबतची योजना शालेय शिक्षण विभागामार्फत प्रस्तावित करण्यात येत आहे अशी माहिती प्रा. वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासाठी लागणाऱ्या निधीसह प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Advertisement

बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण मूल्यांकन करताना सीबीएसईने जाहीर केलेल्या बारावीच्या मूल्यांकनाच्या धर्तीवर तसेच राज्याने इयत्ता १० वी साठी मूल्यांकनाची जी पद्धत निश्चित केली त्याचा तुलनात्मक अभ्यास करून १२ वीच्या विद्यार्थ्यांचे गुण मूल्यांकन करण्याबाबतचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावा असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Mahaupdate.in

Mahaupdate.in is a marathi Online website's, News Updates, Breaking, Politics, Crime, Entertainment, Sports, Money, Jobs, Health, Lifestyle News In Marathi

Recent Posts

Share Market : 1 वर्षात ‘या’ शेयर्सने 1 लाखांचे केले 2 लाख रु. अजूनही संधी असून 3 महिन्यांत 42 % मिळू शकतो नफा !

महाअपडेट टीम, 25 जुलै 2021 :- गेल्या वर्षभरात वॉकहार्ट (Wockhardt ) स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांची संपत्ती दुप्पट…

4 hours ago

Share Market : ‘या’ IT शेयर्सने 1 लाखांचे केले तब्बल 5 लाख रु. गुंतवणूकदार झाले मालामाल !

महाअपडेट टीम, 23 जुलै 2021 :- कोरोना संकट आल्यापासून, 2 क्षेत्रांच्या व्यवसायात मोठी वाढ झाली…

2 days ago

Ind vs SL: पराभवानंतर श्रीलंकेचे कोच मिकी आर्थर, कर्णधार शनका भिडले, व्हिडिओ व्हायरल…

महाअपडेट टीम, 21 जुलै 2021 :- वनडे सीरीजच्या दुसर्‍या सामन्यात भारताने श्रीलंकेला 3 विकेटने पराभूत…

2 days ago