Take a fresh look at your lifestyle.

ब्लॅक फंगस अलर्ट : तुम्ही पण ‘या’ 4 लक्षणांना तोंड देत असाल तर आजच सावध व्हा !

महाअपडेट टीम, 22 जून 2021 :- कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे भारताची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे हादरली होती. हॉस्पिटलमध्ये बेड नसल्यामुळे आणि ऑक्सिजनचा अभाव असल्यामुळे कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

Advertisement

परंतु, सद्यस्थिती पूर्वीच्यापेक्षा चांगली दिसत आहे आणि आता कोरोनाचेही प्रमाण हळूहळू कमी होताना दिसत आहे. परंतु या सर्वांच्या दरम्यान काळ्या बुरशीचे प्रमाण हे कायम वाढतच आहे. कित्येक राज्यांत यापूर्वीच काळ्या बुरशीला सर्व देशभर महामारी म्हणून जाहीर केले आहे. काळ्या बुरशीची काही सुरुवातीची लक्षणे आहेत, ज्यांना सुरुवातीलाच ओळखून या रोगाचा उपचार लवकर होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया कि, ती कोणती लक्षणे आहेत? जी आपल्याला सुरुवातीला काळ्या बुरशीचे संकेत देतात आणि आपण प्रथम कोणती पावले उचलली पाहिजेत?

Advertisement

डोकेदुखी (Headache) :- बर्‍याच वेळा जेव्हा आपल्याला डोकेदुखी असते तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा काही औषध घेतो. परंतु जर तुमची डोकेदुखी बराच काळ टिकून राहिली आणि औषध घेतल्यानंतरही कमी होत नसेल किंवा परत येत राहिली तर तुम्ही ताबडतोब आपल्या डॉक्टरांना भेटावे. वास्तविक, काळ्या बुरशीचा सायनसवर हल्ला होतो, ज्यामुळे त्या व्यक्तीस डोकेदुखी होते. म्हणूनच कोरोनाचे हे लक्षण लक्षात घेऊन आपण त्यावर योग्य ते उपचार केले पाहिजेत.

Advertisement

चेहरा सूजणे किंवा वेदना होणे :- बर्‍याच वेळा जेव्हा आपण तोंडाने फुगे फुगवतो, जास्त बोलतो किंवा जास्त हसतो तेव्हा अशा परिस्थितीत आपले तोंड थोडा वेळ दुखू लागते. हे स्वाभाविक आहे, परंतु जर तुमच्या चेहऱ्याच्या एका बाजूला काही कारण नसताना सूज येणे, तीव्र वेदना होणे, हिरड्या किंवा दातदुखी किंवा इतर कोणतीही समस्या होत असेल, तर अशा परिस्थितीतही तुम्ही त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. हे ही कोरोनाचे लक्षण असू शकते.

Advertisement

नाकावर काळे डाग येणे :- आपल्या चेहऱ्यावर डाग पडणे सामान्य आहे, परंतु जर तुमच्या नाकाच्या सभोवतालच्या भागात काळे डाग येत असतील किव्हा नाकात दुखणे, नाक बंद होणे इ. समस्या होत असतील तर अशा परिस्थितीत, तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना भेटले पाहिजे. ही सर्व काळ्या बुरशीची सुरुवातीची लक्षणे असू शकतात कारण काळ्या बुरशीने त्या व्यक्तीच्या नाकवर हल्ला केलेला असतो.

Advertisement
Advertisement