Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : मुंबईतील बैठकीत ठरलं ! राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची शिर्डी साई संस्थान अध्यक्षपदी लागली वर्णी !

महाअपडेट टीम, 22 जून 2021 :- शिर्डी साईबाबा संस्थांनच्या आणि विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार आणि कोणाला हि खुर्ची मिळणार याकडे सध्या नगर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले लागून होते . यातच आता एक मोठी बातमी समोर अली आहे .

Advertisement

शिर्डी साई संस्थान अध्यक्षपदावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी दावा केला होता. मात्र, आज महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीच्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात आला आहे.

Advertisement

महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत महामंडळ नियुक्त्या आणि साई संस्थान, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी संस्थान विश्वस्तपदाबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

यानुसार आता शिर्डी साईबाबा संस्थान अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर काँग्रेसच्या पारड्यात गेले आहे.  आशुतोष काळे हे शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष असणार आहेत.

Advertisement
Advertisement