Take a fresh look at your lifestyle.

अ.नगर महापालिका निवडणूक : शिवसेना-राष्ट्रवादीचं ठरलं, महापौरपदासाठी ‘हे’ नाव निश्चित, मुंबईतील बैठकीत मोठा निर्णय

महाअपडेट टीम, 22 जून 2021 :- अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे, तसे चर्चा बैठकांचे सत्र सुरू झाले होते. आगामी महापौर पद मिळविण्यासाठी शिवसेनेसह राष्ट्रवादीनेही कंबर कसली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्व नेते तसेच शिवसेनेचे मातब्बर नगरसेवक हे मुंबई दौऱ्यावर होते.

Advertisement

परंतु आता मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत मोठा निर्णय झाला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगतापही उपस्थित होते. महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. आणि महापौर पदासाठी शिवसेनेचा उमेदवार देण्यावरही एकमत झाल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

सध्या महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपचा महापूर असल्याने त्यांची मुदत 30 जूनला संपत असून कोणत्याही क्षणी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.

Advertisement

नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे भाऊ कोरगावकर, संभाजी कदम, अनिल शिंदे, संजय शेंडगे, गणेश कवडे, अनिल बोरूडे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री पवार आणि मंत्री शिंदे यांची भेट घेतली. त्यामध्ये दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

याशिवाय महापौरपद शिवसेनेकडेच देण्यावरही एकमत झाल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेने रोहिणी शेंडगे यांचे नाव या पदासाठी आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे वेगळ्या काही घडामोडी झाल्या नाहीत, तर त्याच पुढील महापौर असतील, अशी चिन्हे आहेत.

Advertisement

सध्या अहमदनगर महापालिका सभागृहात सध्या शिवसेना २३, राष्ट्रवादी १९, भाजप १५, काँग्रेस ५, बसपा ४, सपा १ असे पक्षीय बलाबल आहे.

Advertisement
Advertisement