Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : भाजपचा बडा नेता काँग्रेसच्या वाटेवर, राहुल गांधी यांच्या वाढदिवशी मुंबईत होणार पक्षप्रवेश

महाअपडेट टीम, 17 जून 2021 :-  भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार व  माजी अर्थराज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख हे भाजपला राम राम करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच ते काँग्रेसमध्ये घरवापसी करणार आहेत. .काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विदर्भ दौऱ्यादरम्यान झालेल्या चर्चेनंतर देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेशाचा निर्णय झाला आहे.

Advertisement

काँग्रेस हायकमांडने देशमुख यांच्या प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला असून राहुल गांधी यांच्या वाढदिवशी मुंबईतील कार्यक्रमात ते घरवापसी करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

Advertisement

सुअमरावती मतदारसंघातून 2014 मध्ये त्यांना भाजपने उमेदवारी दिली.  त्यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे सुपुत्र रावसाहेब शेखावत यांचा त्यांनी पराभव केला. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थराज्यमंत्री होते. त्याशिवाय, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

Advertisement

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या होल्डिंग कंपनीचे माजी-उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेडचे सह-अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले.

Advertisement

2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपनं त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी देखील सोपवली होती. 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर अमरावती मतदारसंघातून त्यांनी कॉंग्रेसचे रावसाहेब शेखावत यांचा पराभव केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार सुलभा संजय घोडके यांनी सुनील देशमुख यांचा पराभव केला.

Advertisement
Advertisement