Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक ! पतीसोबत वाद झाल्यानं पाच मुलींसह तिनं घर सोडलं अन् उचललं ‘हे’ टोकाचं पाऊल

महाअपडेट टीम, 10 जून 2021 :- छत्तीसगड येथून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे, पतीबरोबर झालेल्या भांडणानंतर एका महिलेने आपल्या पाच मुलींसोबत चालत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली आहे.

Advertisement

छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यात गुरुवारी पहाटे एक महिला आणि तिच्या पाच मुलींचे मृतदेह रेल्वे रुळावर सापडले. मोठी मुलगी 17 वर्षांची असून सर्वात लहान मुलगी 10 वर्षाची असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement

महासमुंद जिल्ह्यातील अप्पर पोलिस अधीक्षक मेघा टेंभुरकर यांनी सांगितले की, 45 वर्षीय उमा साहू आणि तिच्या मुली अन्नपूर्णा, यशोदा, भूमिका, कुमकुम आणि तुळशी यांनी काल रात्री महासमुंद ते बेलसोंदा रेल्वे क्रॉसिंग दरम्यान रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली.

Advertisement

गुरुवारी सकाळी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले असल्याचे टेंभुरकर यांनी सांगितले.

Advertisement

पतीशी झाला होता वाद :-
पोलिसांच्या माहितीनुसार, साहू कुटुंब हे जिल्ह्यातील बेमचा गावचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. रात्री, जेव्हा महिलेचा तिच्या पतीबरोबर वाद झाला, तेव्हा ति रात्रीच्या वेळीतिच्या पाच मुलींसह घरातून बाहेर पडली. नंतर त्यांचे मृतदेह रेल्वे रुळावर आढळले.

Advertisement

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पतीबरोबर झालेल्या वादानंतर महिलेने हे पाऊल उचलले आहे. तथापि, या संदर्भातील योग्य माहिती तपासणीनंतरच उपलब्ध होईल. घटनास्थळावरून पोलिसांना कोणतेही पत्र सापडले नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Advertisement
Advertisement