Take a fresh look at your lifestyle.

CoronaVirus guidlines for kids : कोरोनाग्रस्त लहान मुलांना Remdesivir, Steroid देऊ नका, लहान मुलांसाठी नवीन गाईडलाईन्स जारी

महाअपडेट टीम, 10 जून 2021 :- Government Guidelines for kids : देशात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता केंद्र सरकार हे रोखण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीये. बर्‍याच शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, जर कोरोनाची तिसरी लाट आली तर त्याचा सर्वात मोठा धोका मुलांना होऊ शकतो.

Advertisement

या सर्व बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारने 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांवर उपचारांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाअंतर्गत डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्स सर्विसने (DGHS) या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये कोरोनावरील उपचारांसाठी मुलांना रेमडेसिवीर न देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. यासह सीटी स्कॅन अत्यंत आवश्यक असतानाच करा असे सांगण्यात आले आहे.

Advertisement

याव्यतिरिक्त, त्यांनी असेही नमूद केले आहे की, 18 वर्षाखालील मुलांमध्ये रीमॅडेसीव्हिरच्या परिणामाबद्दल आणि त्यांच्यासाठी ते किती सुरक्षित आहे याबद्दल अद्याप पुरेसा डेटा उपलब्ध नाही.तसेच एसिम्पटोमॅटिक आणि सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी स्टेरॉईडचा वापर हा घातक असल्याचं म्हटलं आहे. केवळ तज्ञांच्या देखरेखीखाली स्टिरॉइड्स द्यावे. यामुळे त्यांचा उपयोग करण्यापासून वाचलं पाहिजे असं म्हटलं आहे.

Advertisement

लहान मुलांसाठी व 12 वर्षांच्या मुलासाठी 6 मिनिटांची वॉक टेस्ट करावी.
वॉक टेस्टमध्ये मुलाच्या बोटांना ऑक्सिमीटर लावून सलग 6 मिनिटं चालायला लावा.
12 वर्षांहून अधिक वयाच्या मुलांची पालकांच्या देखरेखीखाली 6 मिनिटांची वॉक टेस्ट करावी.
यानंतर ऑक्सिजन सॅच्युरेशन लेवल आणि पल्स रेट मोजावी.यामुळे हायपोक्सियाचे निदान होईल, असं मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे.

Advertisement

तसेच सौम्य लक्षणं दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पॅरासिटामोल (10-15 MG) देता येऊ शकते. कफ असल्यास मोठ्या मुलांनी गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात असंही म्हटलं आहे.

Advertisement
Advertisement