Take a fresh look at your lifestyle.

देशाला मोठा धक्का ! गेल्या 24 तासांत कोरोनाने मृत्यूचे सर्व रेकॉर्ड मोडले, अचानक ही वाढ कशी झाली? जाणून घ्या

महाअपडेट टीम, 10 जून 2021 :- देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची गती कमी होत असताना गेल्या 24 तासात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येने आरोग्य विभागासहीत देशाला धक्का मोठं धक्का बसला आहे.

Advertisement

सलग तिसर्‍या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत घट होत असून गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात बुधवारी गेल्या 24 तासांत 94 हजार 052 करोनाबाधित रुग्ण आढळले असून परंतु मृतांच्या आकड्याने आत्तापयर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

Advertisement

गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 6 हजार 148 लोक मृत्युमुखी पडले आहे. हा आजवरचा एका दिवसतला सर्वाधिक करोना मृत्यूचा आकडा ठरला आहे.

Advertisement

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे 94,052 नवीन रुग्ण आढळले असून आत्तापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2,91,83,121 झाली आहे. तर 6,148 झाल्याने आत्तापर्यंत 3,59,676 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर 1,51,367 रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर आत्तापर्यंत 2,76,55,493 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहे. देशात सध्या एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 11,67,952 आहे.

Advertisement

बिहारमध्ये कोरोना मृत्यूच्या आकडेवारीत हेराफेरी :-
बिहारच्या नितीश सरकारने कबूल केले आहे की, कोरोनामुळे मृत्यूच्या आकडेवारीत मोठी तफावत आहे. बिहारचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांनी बुधवारी सांगितले की, आतापर्यंत मृतांची संख्या 54244 आहे, तर वास्तविक आकडेवारी 9375 ( 7 जूनपर्यंत) आहे.

Advertisement

बिहारमधील कोरोना व्हायरसने झालेल्या मृत्यूच्या 3900 जुन्या रुग्णांची राष्ट्रीय आकडेवारीत भर पडली आहे. दररोज मृत्यूच्या आकडेवारीवरून बिहारमधील मृत्यूचे आकडे काढले गेले तर राष्ट्रीय पातळीवर गेल्या 24 तासांत 2248 रुग्ण मरण पावले आहेत. सरकारी तपासात असे दिसून आले आहे की, जिल्ह्यांमधून पाठविल्या जाणाऱ्या मृतांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात धांदल उडाली होती. जिल्ह्यांनी मृतांची नेमकी संख्याही पाठविली नाही. म्हणूनच चुकीची आकडेवारी देण्यात आल्याचं स्पष्ट आहे.

Advertisement
Advertisement