Take a fresh look at your lifestyle.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : शेतकऱ्यांना आता 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार !

महाअपडेट टीम, 10 जून 2021 :- काल केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देत खरीप हंगाम सुरू होत असताना पिकांसाठी नव्या एमएसपीची घोषणा केली. त्यानंतर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने अतिशय चांगला आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Advertisement

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे बळीराजाला एक मोठा दिलासा मिळणार आहे. काँग्रेस नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील याबाबत माहिती दिली.

Advertisement

यंदाच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापनदिनी महाविकास आघाडी सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

Advertisement

बिनव्याजी पीक कर्जाची ही सवलत पूर्वी केवळ १ लाख रूपयांपर्यंत होती. या निर्णयाचा शेतकऱ्यांना निश्चितच मोठा लाभ होईल. अस ट्विट अशोक चव्हाण यांनी केले.

Advertisement

 

Advertisement
Advertisement