Take a fresh look at your lifestyle.

विजेच्या खांबावर चढला 10 फूट लांबीचा साप, पुढं काय झालं पहा ?, व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल !

महाअपडेट टीम, 10 जून 2021 :- विजेच्या तारांना स्पर्श केल्याने झटका बसतो हे मनुष्यप्राण्याला माहीत आहे मात्र प्राण्यांना याची काहीच कल्पना नसते. याच कारणामुळे अनेकदा त्यांना याचा त्रास होतो. असेच काहीसे मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये घडले आहे.

Advertisement

येथे एक साप विजेच्या खाबावर चढला. साधारण 10 फुटांचा हा साप जेव्हा हायवोल्टेज लाईनवर चढल्यानंतर सारेच हैराण झाले. लोकांनी लगेचच याचा व्हिडिओ बनवला आणि सापाला खांबावर चढताना लोकही भयभीत झाले.

Advertisement

कोणीतरी याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. ही घटना इंदूरच्या सिंधी कॉलनीच्या जागृतीनगरमधील आहे. येथे १० फुटांचा साप सरपटत केबलच्या माध्यमातून विजेच्या खांबाजवळ पोहोचला आणि पाहता पाहता विजेच्या तारांपर्यंत पोहोचला.

Advertisement

Advertisement

यादरम्यान सापाने उतरण्याचा प्रयत्न केला तेव्हा अचानक जोरात धमाका झाला आणि साप तब्बल २५ फूट जमिनीवर धडाम करून खाली पडला. सापाला इतक्या जोरात विजेचा झटका लागला की तो जमिनीवर बराच वेळ तडफडत होता.

Advertisement

यात साप गंभीर पद्धतीने जखमी झाला. मात्र जमिनीवर पाणी आणि गवत असल्यामुळे तो मेला नाही. तो जमिनीवरून जोरात सरपटण्याचा प्रयत्न करत होता मात्र करंट लागल्याने तो गंभीर जखमी झाला. यानंतर या भागातील लोकांनी सर्पमित्राला बोलावले आणि सापाला घेऊन जाऊन त्याने जंगलात नेऊन सोडले. सोशल मीडियावर सापाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Advertisement
Advertisement