Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारचं शेतकऱ्यांना गिफ्ट, हमीभाव 2021-22 जाहीर, खरीप हंगामासाठी MSP 50 टक्क्यांनी वाढवला !

महाअपडेट टीम, 9 जून 2021 :- केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी ( 9 जून) धान्यासहित अनेक खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP ) मध्ये वाढ करण्याची घोषणा केली. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, तांदळाच्या एमएसपीमध्ये (MSP ) प्रति क्विंटलमागे 72 रुपयांची वाढ झाली असून ती मागील वर्षी सर्वसाधारण किंमतीच्या तांदळाचा दर 1,868 रुपये प्रति क्विंटल होता. आता त्याची त्याची किंमत वाढून1,940 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे.

Advertisement

खरीप पिकासाठी सरकारने हमीभावात 50 ते 62 टक्के वाढ केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तिळाच्या (MSP ) मध्ये (452 ​​रुपये प्रतिक्विंटल) सर्वाधिक वाढ झाली असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. तिळानंतर तूर आणि उडीदसाठी (दोन्ही 300 रुपये क्विंटल) सर्वाधित MSP ठरवण्यात आली आहे. कृषीमंत्री तोमर यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ते म्हणाले की, सरकारने शेवटकाऱ्यांच्या हितासाठी गेल्या 7 वर्षात अनेक निर्णय घेतले आहेत.

Advertisement

भुईमूग :- प्रति क्विंटलमध्ये 275 रुपये
खुरासणी :- प्रति क्विंटलमध्ये 235 रुपये

Advertisement

खरीप 2021-22 साठीचे हमीभाव –

Advertisement

Advertisement
Advertisement