Take a fresh look at your lifestyle.

खुशखबर : सेंट्रल बँकेत 111 दिवसांची FD करा अन् कोरोना वॅक्सीन घ्या, बँक FD देत आहे जास्त व्याजदर

महाअपडेट टीम, 9 जून 2021 :- जर तुम्हाला कोरोनाची लस मिळाली असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. कोरोना लस घेतलेल्या लोकांना बँक एक खास ऑफर देत आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने अशा लोकांसाठी एक ऑफर आणली आहे. ज्या लोकांनी कोरोना लसीचे डोस घेतले त्यांना निश्चित ठेवीवर (fixed deposit) जास्त व्याजाच्या ऑफर मिळतील.

Advertisement

या बँकेने दिली ऑफर :- कोरोनाविरूद्ध लस हे एक मोठे शस्त्र म्हणून उदयास येत आहे. सरकारची इच्छा आहे की देशातील बहुतेक लोकांना शक्य तितक्या लवकर कोरोना लस देण्यात यावी. बँकिंग क्षेत्रानेही सरकारच्या या हालचालीला पाठिंबा दिला आहे.

Advertisement

एफडीवर अधिक व्याज मिळेल :- सेंट्रल बँकेने अलीकडेच इम्यून इंडिया डिपॉझिट योजना (Immune India Deposit Scheme) सुरू केली आहे, या योजनेद्वारे बँक 111 दिवसांपर्यंतच्या एफडीवर 25 एक्सट्रा बेसिक प्वाइंट्स ऑफर (Extra Basic Points Offer) देत आहे. लसीकरणाला चालना देण्यासाठी त्यांनी ही योजना आणली असून, ज्येष्ठ नागरिकांनाही अतिरिक्त लाभ मिळतील, असे बँकेने म्हटले आहे. ट्वीटद्वारे बँकेने या योजनेची माहिती दिली आहे. यामुळे लोकांना लस घेण्यास प्रेरणा मिळेल, अशी बँकेची अपेक्षा आहे.

Advertisement

सप्टेंबर पर्यंत युको बँकने (ukon bank) दिल्या ऑफर :- युको बँकेने अलीकडेच ही ऑफर सादर केली असून या लस घेणार्‍यांना खास ऑफर देण्यात आली होती. या प्रस्तावानुसार, ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे त्यांना 999 दिवसांसाठी एफडी मिळविण्याकरिता अतिरिक्त 30 आधार गुण (basis point) दिले जातील. पीटीआयच्या म्हणण्यानुसार ही ऑफर 30 सप्टेंबरपर्यंत आहे.

Advertisement
Advertisement