Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाचं नवं संकट : कोविशील्ड घ्या नाहीतर कोवॅक्सीन घ्या, डेल्टा व्हेरियंट पुन्हा संक्रमित करतोय, एम्सचं धक्कादायक संशोधन

महाअपडेट टीम, 9 जून 2021 :- काही दिवसांपूर्वी शास्त्रज्ञांना एका अभ्यासातून असे आढळले होते की, कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळेच दुसरी लाट इतकी प्राणघातक ठरत आहे. डेल्टा व्हेरिएंट संक्रमित झालेल्या मृत्यूंवरून अंदाज लावला जाऊ शकतो की, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत तीन महिन्यांच्या आतच देशात मृतांची संख्या साडेतीन लाखांच्या जवळपास पोहोचली. कोरोनाचा हा डेल्टा व्हेरियंट इतका प्राणघातक आहे की, कोरोना वॅक्सीन घेऊनही डेल्टा व्हेरियंट पुन्हा संक्रमित करू शकतो. एम्सच्या अभ्यासामध्ये ही बाब समोर आली आहे.

Advertisement

राजधानी दिल्लीत असलेल्या एम्स आणि नॅशनल सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल च्या वेगळ्या अभ्यासात समोर आले आहे की, कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन वॅक्सीन घेतल्यानंतरही कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट संक्रमित करू शकतो.

Advertisement

एम्सच्या (AIIMS) अभ्यासानुसार, डेल्टा व्हेरियंट एखाद्या व्यक्तीस अल्फा व्हेरियंटपेक्षा 40 ते 50 टक्के जास्त संक्रमित करू शकतो, जरी त्या व्यक्तीने लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरीही. एम्स-आईजीआईबी (इंस्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स एंड इंटीग्रेटिव बायोलॉजी) च्या अभ्यासानुसार, त्यांनी 63 संक्रमित रुग्णांवर हा अभ्यास केला. या रूग्णांना 5-7 दिवस तीव्र ताप आल्यानंतर रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डात ठेवण्यात आले होते.

Advertisement

या 63 लोकांपैकी 53 लोकांना कोव्हॅक्सिनचा किमान एक डोस आणि उर्वरित लोकांना कोविशील्डचा एक डोस दिला गेला. आणि 36 लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले. ज्यांना लसीचा एक डोस दिला त्यांच्यामध्ये 76.9 टक्के रुग्णांना डेल्टा व्हेरिएंटचं इन्फेक्शन आढळून आलं. तर दोन्ही लस घेतलेले 60 टक्के लोक पुन्हा संक्रमित झाले.

Advertisement

कोविशील्डबद्दल अधिक संशय :-
एम्सच्या अभ्यासानुसार, कोविशील्ड लसीबद्दल अधिक शंका घेण्यात आली आहे. अभ्यासात असे आढळले आहे की, अशा लोकांना डेल्टा व्हेरिएंटच्या संसर्गाची लागण जास्त झाली आहे, ज्यांना कोविशल्ड लस देण्यात आली आहे. डेल्टा व्हेरिएंटचं इन्फेक्शन ज्या 27 रूग्णांना झालं त्यांनी ही लस घेतली होती. त्यांचा संसर्ग दर 70.3 % होता.

Advertisement

या व्यतिरिक्त कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अल्फा व्हेरिएंटवर अधिक परिणामकारक असल्याचे अभ्यासात उघडकीस आले आहे. या दोन्ही लस संसर्गाच्या अल्फा प्रकारापासून संरक्षण करण्यास सक्षम आहेत.

Advertisement
Advertisement