Take a fresh look at your lifestyle.

अर्थमंत्री अजित पवार यांचा गजनी झाला आहे का?, भाजपच्या बड्या नेत्याची सडकून टीका

महाअपडेट टीम, 9 जून 2021 :- कोरोनामुळे अनेक गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, अनेक शेतकऱ्यांचे हाल होताना दिसत आहेत. त्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी सरकार मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे. असे सांगण्यात आले होते.

Advertisement

राज्य सरकार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत करणार आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर ही मदत करण्यात येईल. असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते.

Advertisement

मात्र, आता पावसाळा सुरू झाला तरी शेतकऱ्यांना योग्य ती मदत न पोहोचल्याने भाजपचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, दोन लाखांपर्यंत कर्जाचे वन सेटलमेंट करू आणि नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन म्हणून देऊ, अशी घोषणा करणारे आणि विधानसभेत टाळ्या मिळवणारे अर्थमंत्री अजित पवार यांचा गजनी झाला आहे का?, असा सवाल बोंडे यांनी केला आहे.

Advertisement

तुम्हाला गजनी चित्रपट आठवतो का? गजनी सर्व काही विसरायचा, अशा शब्दात त्यांनी अजित पवारांची सडकून टीका केली आहे. २०१९ च्या खरीप हंगामामध्ये १ कोटी २८ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. तेव्हा तब्बल ८५ लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी ५ हजार ७९५ कोटी रुपये मिळाले होते, असे देखील बोंडे म्हणाले.

Advertisement

राज्यातील ठाकरे सरकारने पीक विमा कंपन्यांशी करार करताना निकष बदलल्यामुळे शेतकऱ्यांचे ४ हजार २३४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप देखील अनिल बोंडे यांनी केला आहे. राज्याच्या कृषिमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नाहीतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, असे देखील ते म्हणाले आहेत.

Advertisement

दरम्यान, खासगी विमा कंपन्यांच्या घशात राज्याच्या शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे ठाकरे सरकारच्या चुकीमुळे गेले आहेत. तसेच, हे दलालांचे सरकार असून त्यांनी विमा कंपन्यांसाठी दलाली केल्याचा आरोपही अनिल बोंडे यांनी केला आहे. यामुळे सरकार शेतकऱ्यांना आतातरी मदत करणार की नाही, हे बघणे आता महत्वाचे आहे.

Advertisement
Advertisement