Take a fresh look at your lifestyle.

Coronavirus In India Live Updates : बापरे ! कोरोनाची त्सुनामी, गेल्या 24 तासात तब्बल 3 हजार 786 रुग्णांचा मृत्यू, तर 3 लाख 83 हजार रुग्ण आढळले !

महाअपडेट टीम, 5 मे 2021 :- भारतातील कोरोना विषाणूचा वेग अद्यापही ब्रेक झालेला नाही. गेल्या दोन-तीन दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट दिसून आली असली तरी अद्यापही ती देशासाठी आपत्ती ठरत आहे. देशात कोरोना विषाणूच्या मृत्यूत तसेच नवीन रुग्णांमध्येही मोठी वाढ झाली आहे.

Advertisement

भारतात गेल्या 24 तासात 3 लाख 82 हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. ती सोमवारच्या तुलनेत तब्बल 28 हजारांपेक्षा अधिक आहे. भारतात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा हा 2 कोटींपेक्षा अधिक झाला आहे. फक्त 15 दिवसातच कोरोना रुग्णांची संख्या 50 लाखांच्या पुढे गेली आहे.

Advertisement

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी (4 मे) एका दिवसात कोरोना व्हायरसचे 3 लाख 82 हजार 691 रुग्ण आढळले असून तब्बल 3 हजार 786 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. यापूर्वी सोमवारी (3 मे) एका दिवसात 3 लाख 55 हजार 828 नवीन रुग्ण आढळले होते तर 3 हजार 400 लोकांचा मृत्यू झाला होता.

Advertisement

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरसचे एका दिवसात 3 लाख 82,691 नवीन रुग्ण आढळल्याने कोरोना रुग्णांची संख्या ही 20665524 पर्यंत वाढले आहे, तर 3786 लोकांचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या 226194 वर पोहचली आहे.

Advertisement

7 ऑगस्ट रोजी भारतातील कोविड -19 च्या संक्रमितांनी 20 लाखांचा टप्पा ओलांडला. यानंतर 23 ऑगस्ट रोजी 30 लाख, 5 सप्टेंबरला 40 लाख आणि 16 सप्टेंबरला 50 लाख लोकांना लागण झाली आहे.

Advertisement

जगभरातही कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार झपाट्याने होत आहे, संक्रमित लोकांची संख्या 15.35 कोटींहून अधिक झाली आहे. आणि 32.13 लाखाहून अधिक लोक मरण पावले आहेत. अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील विज्ञान आणि अभियांत्रिकी केंद्रने (सीएसएसई) जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार जगातील 192 देशात 15 कोटी 35 लाख 59 हजार 931, तर 32 लाख 13 हजार 878 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement
Advertisement