Take a fresh look at your lifestyle.

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची श्रीगोंदा तालुक्यातील ‘या’ कोविड सेंटरला 1 लाखाची मदत !

महाअपडेट टीम, 4 मे 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथे लोकसहभागातून चाललेल्या श्री व्यंकनाथ कोविड सेंटर साठी चेन्नई सुपर किंग्जचा आघाडीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड याने 1 लाखाची मदत पाठविणार आहे. किर्लोस्कर कंपनीची टीम भेट देऊन ही रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती लोणीव्यंकनाथचे उपसरपंच मितेश नाहाटा यांनी दिली.

Advertisement

बाळासाहेब नाहाटा यांच्या प्रयत्नातून लोणी व्यंकनाथ येथे सुरु केलेले कोविड सेंटरची सध्या तालुक्यात रुग्णांच्या उपचाराची मोठ्या प्रमाणावर सोय झाली आहे
यासाठी ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्यासाठी या उपक्रमाची दखल लोकमतने सर्वप्रथम दखल घेतली. त्यानंतर इंडीया फोब्ज या इंग्रजी नियतकालीकाने दखल घेतली.

Advertisement

त्यावर ऋतुराज गायकवाड याने पुण्यातील एका मित्राच्या मार्फत मितेश नाहाटांशी संपर्क साधला. ग्रामीण भागातील कोविड रुग्णांना जीवनदान देण्यासाठी एक लाखाची मदत जाहीर केली.

Advertisement

अन्य खेळाडुंकडून मदत मिळवून देण्यासाठी ऋतुराज गायकवाड मदत करणार असल्याचे समजते. तसेच लोणी व्यंकनाथ येथील कोविड सेंटरला किर्लोस्कर कंपनीची टीमही भेट पाहणी करून मदत करणार असल्याचे समजते.

Advertisement
Advertisement