Advertisement

खा. सुजय विखेंच्या ‘त्या’ दाव्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व रोहित पवार यांच्यासह ‘हे’ नेते अडचणीत !

Advertisement

महाअपडेट टीम, 4 मे 2021 :- विनापरवाना रेमडेसिवीर इंजेक्शनाचा साठा व वाटप केल्याप्रकरणात अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांच्याविरोधात हायकोर्टात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत, याचिकाकर्त्यांनी दुरुस्ती अर्ज दाखल केला आहे. त्या आधारे राज्यात विविध ठिकाणी काही राजकीय नेत्यांनी, त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व रोहित पवार, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार अमरिश पटेल यांनीही कायदेशीर अधिकार नसताना रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप केल्याचा आरोप केला आणि त्यांच्यावर कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.

Advertisement

रेमडेसिवीर इंजेक्शन वाटपप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेत आपल्यालाही प्रतिवादी करावे, असा अर्ज नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वतीने करण्यात आला आहे. आपण 1700 इंजेक्शन चंदीगड येथे खरेदी करून शिर्डीला आणल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Advertisement

तर जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या शपथपत्रात विखे यांनी इंजेक्शनसाठी परवानगी दिली होती, मात्र ती चंदीगडहून आणल्याचे माहिती नसल्याचे म्हटले आहे. यावर पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार असून डॉ. विखे यांना प्रतिवादी करून घ्यायचे किंवा नाही, यावरही त्याच दिवशी निर्णय होण्याची शक्यता आहे. तर याचिकाकर्त्यांनी दुरूस्ती अर्ज सादर करून अशा पद्धतीने इंजेक्शन आणणाऱ्या अन्य नेत्यांवरही कारवाईची मागणी केली आहे.

Advertisement

काही दिवसांपूर्वी डॉ. सुजय विखे-पाटील यांनी अहमदनगरमध्ये रेमडिसव्हीर इंजेक्शनचं वाटप केले होते. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू, चंद्रभान घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी ॲड. सतीश तळेकर यांच्यामार्फत फौजदारी याचिका दाखल केली होती.

Advertisement

सदर इंजेक्शनचा साठा भेसळमुक्त/ शुद्ध आहे, असे प्रमाणपत्र वापराआधी घेतलेले नाही. एवढा मोठा इंजेक्शनचा साठा कुठे व कसा वापरला, याचा हिशेब नाही, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता.

Advertisement
Advertisement
Advertisement
Mahaupdate.in

Mahaupdate.in is a marathi Online website's, News Updates, Breaking, Politics, Crime, Entertainment, Sports, Money, Jobs, Health, Lifestyle News In Marathi

Recent Posts

शरीरातील डोक्यापासून पायापर्यंत ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या कशा कराल ?

महाअपडेट टीम, 5 मे 2021 :- रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना शारीरिक दुखणे व वेगवेगळ्या आजारांना…

53 mins ago

Coronavirus In India Live Updates : बापरे ! कोरोनाची त्सुनामी, गेल्या 24 तासात तब्बल 3 हजार 786 रुग्णांचा मृत्यू, तर 3 लाख 83 हजार रुग्ण आढळले !

महाअपडेट टीम, 5 मे 2021 :- भारतातील कोरोना विषाणूचा वेग अद्यापही ब्रेक झालेला नाही. गेल्या…

3 hours ago

Coronavirus In Maharashtra Live Updates : भयावह ! आज एकट्या महाराष्ट्रातच झालेत 891 मृत्यू, तर 50 हजारांहुन अधिक रुग्ण आढळले !

महाअपडेट टीम, 4 मे 2021 :- महाराष्ट्रातील कोरोनाची साखळी तुटताना दिसत असून आता कोरोनाबाधितांची संख्या…

14 hours ago

धक्कादायक ! देशात प्रथमच प्राण्यांना कोरोनाची लागण, ‘या’ ठिकाणी आढळले 8 सिंह कोरोना पॉझिटिव्ह

महाअपडेट टीम, 4 मे 2021 :- आधीच मानव कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेने बेजार झाला असून…

15 hours ago

BREAKING : वडील रुग्णालयात, आई बहीण होम क्वारंटाईन, आता दीपिका पादुकोणही कोरोना पॉझिटिव्ह !

महाअपडेट टीम, 4 मे 2021 :-  कोरोना विषाणूची दुसरी लाट थांबायचं नाव घेत नाही. सर्व…

16 hours ago

मन सुन्न करणारी घटना : कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू, मुलीने जळत्या चितेत मारली उडी !

महाअपडेट टीम, 4 मे 2021 :- राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातुन एकमन सुन्न करणारी वेदनादायक घटना समोर…

16 hours ago