Take a fresh look at your lifestyle.

Coronavirus In India Live Updates : दिलासादायक ! गेल्या 24 तासात रुग्णसंख्येत झालीये घट, मात्र देशाने नोंदवलाय ‘हा’ अनपेक्षित रेकॉर्ड !

महाअपडेट टीम, 4 मे 2021 :-  भारतात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरूच असून रोज नवीन विक्रम मोडित निघत असताना गेल्या 24 तासात भारतात कोरोनाचे 3 लाख 55 हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. 3 मेच्या तुलनेत गेल्या 24 तासात रुग्णवाढीत घट झाली असली तरी देशात आणखी एक अनपेक्षित विक्रम नोंदला गेला आहे.

Advertisement

भारतात कोरोनाने संसर्ग झालेल्या लोकांची संख्या 2 कोटींहून अधिक झाली आहे.  भारत आता जगातील असा दुसरा देश आहे जिथे एकूण कोरोनाचे रुग्ण 2 कोटी ओलांडले आहेत. भारतात कोरोना संसर्गाची गती इतकी वेगवान आहे की अवघ्या 137 दिवसांत ही संख्या 1 कोटींवर पोहचली आहे. यापूर्वी संक्रमित संख्येत एक लाख ते एक कोटीपर्यंत पोहोचण्यासाठी 360 दिवस लागले. म्हणजेच चार महिन्यांत कोरोनाची प्रकरणे दुप्पट झाली आहे.

Advertisement

एका दिवसात 3400 हून अधिक रुग्णांचा मृत्यू :- सोमवारी देशात कोरोनाची 3 लाख 55 हजार 828 नवीन रुग्ण वाढले आहेत. आणखी 3 हजार 438 रुग्णांनी जीव गमावला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, संक्रमित लोकांची एकूण संख्या 2 कोटी 2 लाख 75 हजार 543 पर्यंत पोहोचली आहे, जी संक्रमणाच्या एकूण घटनांपैकी 17.13 टक्के आहे.

Advertisement

तर मृतांची संख्या वाढून 2 लाख 22 हजार 666 झाली आहे. 01 मे रोजी देशात संसर्गाची 4,01,993 नवीन नोंद झाली होती, तर 2 मे रोजी 3,92,488 प्रकरणे नोंदली गेली. कोरोनामध्ये सक्रिय रूग्णांची संख्या 34,44,548 वर वाढली आहे.

Advertisement
Advertisement