Take a fresh look at your lifestyle.

BREAKING : वडील रुग्णालयात, आई बहीण होम क्वारंटाईन, आता दीपिका पादुकोणही कोरोना पॉझिटिव्ह !

महाअपडेट टीम, 4 मे 2021 :-  कोरोना विषाणूची दुसरी लाट थांबायचं नाव घेत नाही. सर्व निर्बंध असूनही, कोरोना विषाणूमुळे खळबळ उडाली आहे. काही काळापूर्वीच दीपिका पादुकोणचे वडील प्रकाश पादुकोण यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली.आता अभिनेत्री दीपिका पादुकोणही कोरोनाच्या विळख्यात सापडली असून तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

Advertisement

गेल्या आठवड्यात दीपिकाच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती ते घरीच उपचार घेत होते परंतु परिस्थिती बिघडल्यानंतर काही वेळापूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणही कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे.

Advertisement

याबद्दल प्रकाश पादुकोण बॅडमिंटन अ‍ॅकॅडमीचे संचालक विमल कुमार यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, दीपिकाचे वडील, आई आणि बहिणी पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केलं आहे. पण आठवडा झाल्यानंतरही प्रकाश पादुकोण यांचा टॅप कमी झाला नसल्याने त्यांना बंगलोर येथील हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे.

Advertisement

एंटरटेनमेंट इंडस्ट्रीवरही कोरोनाचा कहर सुरु असून सध्या रुबीना दिलक, हिना खान, अनिरुद्ध दवे यांना कोरोनाची लागण झाली आहे आता त्यात दीपिका पादुकोणचे नवीन नावही जोडले गेले आहे. यापूर्वी आलिया भट्ट, भूमि पेडणेकर, विक्की कौशल, कतरिना कैफ, अक्षय कुमार आणि सोनू सूद सारख्या स्टार बॉलिवूडमधील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. यातील बरेच जण आताच बरे झाले आहेत.

Advertisement
Advertisement