Take a fresh look at your lifestyle.

कोरोना संकटात मोदी सरकारची मोठी मदत, राज्य सरकारांना मिळेल आता ‘इतक्या’ कोटींचा निधी !

महाअपडेट टीम, 1 मे 2021 :- कोरोनाव्हायरस आजाराच्या या संकटात केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारने राज्यांना मदत करण्यासाठी निधी जाहीर केला आहे. वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मंत्रालयाच्या (Dept Of Expenditure) व्यय विभागाने 2021-22 या वर्षात राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (State Disaster Response Fund-SDRF) भागाचा पहिला हप्ता जारी केला आहे.

Advertisement

व्यय विभागाने पहिल्या हप्त्यासाठी 8,873.6 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे की, जाहीर झालेल्या फंडापैकी पैकी 50 टक्के निधी राज्य कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी वापरु शकतात.

Advertisement

Advertisement

अर्थ मंत्रालयाच्या शिफारशीनुसार अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने राज्यांना 8,873.6 कोटी रुपयांची रक्कम जाहीर केली आहे. महत्त्वाचे म्हणजे एसडीआरएफ पहिला हप्ता हा जूनमध्ये जारी केला जातो, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वित्त आयोगाच्या शिफारशींच्या आधारे कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी राज्यसरकार जारी केलेल्या निधीचा वापर करू शकतात.

Advertisement

एसडीआरएफ तर्फे देण्यात आलेल्या या निधीला राज्यांद्वारे कोरोनाशी संबंधित विविध उपायांसाठी वापरला जाऊ शकतो. यामध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, रुग्णालये, एअर प्यूरिफायर, रुग्णवाहिका सेवा मजबूत करणे, कोविड केअर सेंटरमधील ऑक्सिजन उत्पादन आणि स्टोरेज प्लांट्सचा खर्च भागविण्यात येऊ शकतो.

Advertisement
Advertisement