Take a fresh look at your lifestyle.

मुलगा पाचव्या लग्नाची तयारी करत होता, पित्याने रोखले असता केले कुऱ्हाडीने वार

महाअपडेट टीम, 30 एप्रिल 2021 :- बिहारमधील जमुई येथे पाचव्या लग्नाची तयारी करत असलेल्या तरुणाला पित्याने रोखल्याने संतापलेल्या तरुणाने पित्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालत निर्घृण हत्या केली.

Advertisement

ही घटना जिल्ह्यातील गिधौर पोलिस ठाण्यांतर्गत खैरा पोलिस स्टेशन परिसरातील कोल्हुआ पंचायत अंतर्गत सिमरिया गावच्या महादलित टोलाची आहे. माधो मांझी (वय 62) असे हत्या झालेल्या मृतकाचे नाव आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री पाचव्या लग्नाची तयारी करत असलेल्या मुलासोबत (कारु मांझी) याचे वडील (माधो मांझी) यांच्यात वाद झाला.

Advertisement

यानंतर संतापलेल्या मुलाने रात्री उशिरा वडील शौचालयाला गेले असता मागून येऊन कुऱ्हाडीने वार केले. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी खैरा पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. याची माहिती मिळताच खैरा पोलिस ठाण्यातून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आलेल्या एएसआय राजेश पासवान आणि एसआय शंभू शर्मा यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठविला असून आरोपी मुलगा फरार आहे.

Advertisement

या संदर्भात एसएचओ सिद्धेश्वर पासवान म्हणाले की, ही घटना लग्नाच्या वादात घडली आहे. मृताच्या मुलाचे चार विवाह झाले असून प्रत्येकाला मुले आहेत.परंतु त्याच्या रंगीत स्वभावामुळे बायको राहू शकल्या नाही पुन्हा आरोपी मुलगा लग्नासाठी कुटुंबावर दबाव आणत होता. ही घटना त्याच वादाच्या भोवऱ्यात घडली आहे.

Advertisement
Advertisement