Take a fresh look at your lifestyle.

Coronavirus In India Live Updates : 24 तास धगधगणारं स्मशान, गेल्या 24 तासांत 3,501 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर आढळलेत ‘इतके’ रेकॉर्डब्रेक रुग्ण

महाअपडेट टीम, 30 एप्रिल 2021 :- भारतात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरूच असून रोज नवीन विक्रम मोडित निघत आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात तब्बल 3 लाख 86 हजार रुग्ण आढळल्याचे समोर आलं आहे. अशाप्रकारे संक्रमणाच्या प्रत्येक दिवशी मागील दिवसाचे रेकॉर्ड मोडले जात आहे.

Advertisement

मृत्यूचे प्रमाणही वाढत असून गेल्या 24 तासांत 3,501 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे, त्यात महाराष्ट्रातील 1 771 आणि दिल्लीत 395 रुग्णांचा समावेश आहे. तर छत्तीसगडमध्ये 210, उत्तर प्रदेशात 295, कर्नाटकात 297, गुजरातमध्ये 180, झारखंडमध्ये 145, पंजाबमध्ये 137, राजस्थानमधील 158, उत्तराखंडमधील 85 आणि मध्य प्रदेशात 95 लोकांचा मृत्यू झाला.

Advertisement

देशात सातत्याने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 कोटी 83 लाख 76 हजार 524 झाला असून सध्या 30 लाख 84 हजार 814 रुग्ण उपचार घेत आहेत.

Advertisement

ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या एकूण बाधित रुग्णांच्या तुलनेत 16.79 टक्के असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. मात्र, देशभरातील बरे होण्याच्या प्रमाणात घट झाल्याने ते 82.10 टक्क्यांपर्यंत खाली आहे. देशभरात आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 86 हजार 878 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील मृत्युदर 1.11 टक्क्यापर्यंत खाली आला आहे.

Advertisement

28 एप्रिलपर्यंत देशभरात एकूण 28 कोटी 44 लाख 71 हजार 979 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 17 लाख 68 हजार 910 लोकांची बुधवारी चाचणी केली. गत 24 तासांमध्ये नोंद झालेल्या नव्या रुग्णांमध्ये 72.20 टक्के रुग्ण दहा राज्यांमधील आहेत. तर 78.71 टक्के मृत्यू हे महाराष्ट्रासह 10 राज्यांमधील आहेत.

Advertisement
Advertisement